पुणे
सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात जन्मदात्या पित्याकडूनच १७ वर्षीय मुलीचा पाच वर्षांपासून विनयभंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांसह सावत्र आईकडून देखील पिडीत तरुणीचा पाच वर्षांपासून छळ केला जात होता.अखेर पिडीत तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आई वडिलांच्या विरोधात केला गुन्हा दाखल केला असून सागर पवार (३८) आणि उज्वला पवार (३५) असे आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही तिच्या वडिल आणि सावत्र आईसह येरवडा भागात वास्तव्यास आहे. वयाच्या अवघ्या पाच वर्षाची असताना पिडीत तरुणीची आईचे निधन झाले होते. त्यानंतर वडील जे भाजी विक्रेते आहेत, त्यांनी दुसरे लग्न केले होते. २०१८ पासून आई वडिलांनी मिळून अनेक वेळा या तरुणीचा विनयभंग केला.
दोघांनी मिळून तिचा अनेक वेळा मानसिक छळ देखील केला.या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांनी तिच्यावर बलात्कार करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण तरी सुद्धा तिच्या आईने अनेक वेळा पतीचीच बाजू घेतली. १२वीच्या बोर्डाचा परीक्षेला जाताना एके दिवशी तिच्या वडिलांनी तिचे हॉल तिकीट फाडले.
हताश झालेल्या या तरुणीने हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर त्या दोघींनी पोलिस ठाणे गाठले.पोलिसांनी त्या दोघांवर विनयभंगचा गुन्हा दाखल केला असून वडील सागर पवारला अटक केली आहे. आरोपींवर भारतीय दंडात्मक कलम अन्वये कलम ३५४, ३२४, ५०४ यासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस सुरू आहे.