खळबळजनक !!!!!! वीस वर्षीय तरुणीची केली हत्या,

खळबळजनक !!!!!! वीस वर्षीय तरुणीची केली हत्या,

मुंबई

वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कुर्ला भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणी मृतावस्थेत आढळली होती.

इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळल्याची माहिती आहे.

कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
इन्स्टाग्राम व्हिडीओ शूटला गेलेले तरुण
एचडीआयएल कंपाऊडमधील ही इमारत बंद असते.

मात्र 18 वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे.

तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

तरुणीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करत आहेत. एचडीआयएल कॉलनीमध्ये परिसरातील झोपडपट्टीवासियांचे नुकतेच पुनर्वसन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *