कोल्हापुर
ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभा म्हटलं की काही ठिकाणी सत्ताधारी आणि विराेधकांत हमरीतुमरी हाेते. त्याचे पर्यवासन राड्यात हाेते हे आपण अनेकदा पाहिलं आहे.
असाच प्रकार बुधवारी काेल्हापूर जिल्ह्यात झाला. अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत त्यामुळे गाेंधळ निर्माण झाला. त्यातून भरसभेत राडा झाला.
त्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होऊ लागले आहेत.कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी झाली.
या सभेत काही विषयांवरुन राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर अक्षरशः सभागृहातील खुर्च्या फेकून मारल्या.
या राड्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे.
अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत त्यामुळे एका गट चिडला आणि त्यानंतर राडा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान यापूर्वी ग्रामपंचायतीची तब्बल चार वेळा ग्रामसभा तहकूब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या सभेचे राड्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या घटनेची नाेंद पाेलिसांत दाखल झालेली नाही.