खळबळजनक!!!!!!     “भाडे वगैरे देवू नका, फक्त मला खुश करा” पुणे जिल्ह्यातील “या” गावातील विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी

खळबळजनक!!!!!! “भाडे वगैरे देवू नका, फक्त मला खुश करा” पुणे जिल्ह्यातील “या” गावातील विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी

पुणे

भाडे वगैरे देवू नका फक्त मला खुश करा असे म्हणून पिकअप चालकाने विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी करून छेडछाड केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गाढवे वस्ती परिसरात शुक्रवारी (ता.8) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

• याप्रकरणी थेऊर येथील पिकअप चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

• नंदु जाधव (वय 25, जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

• याप्रकरणी एका 26 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

• पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्या व त्यांची जाऊबाई एकाच ठिकाणी नोकरी करतात.

• नेहमीप्रमाणे फिर्यादी व त्यांची जाऊ शुक्रवारी कामाला गेल्या होत्या.

• कामावरून सुट्टी झाल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास थेऊर फाटा येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या.

• त्याचवेळी नंदु जाधव हा पिकअप घेऊन थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेने चालला होता.

• जाधव हा फिर्यादी यांना म्हणाला घराकडे सोडवितो, गाडीत बसा.

• तेव्हा फिर्यादी यांनी गाडीत बसण्यास होकार दिला.

• गाडीत बसल्यानंतर सदर पिक अप थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल ओलांडून गाढवे वस्ती जवळ आला.

• त्यावेळी जाधव याने आंधाराचा फायदा घेवून फिर्यादी यांच्या उजव्या मांडीला स्पर्श केला.

घडलेली घटना

• त्यानंतर फिर्यादी व त्यांची जाऊ यांनी गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला व “तुझे काय पैसे झाले असेल ते भाडे घे, मात्र आम्हाला येथे उतरु दे.” असे सांगितले.

• तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या खांद्यावर हात टाकला व म्हणाला की, “काय होतंय एवढं, मला भाडे वगैरे देवू नका फक्त मला खुश करा” असे म्हणून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.

तक्रार आणि आरोप

• नंदु जाधव याने लगट करून विवाहितेची छेडछाड केली आहे.

• त्यामुळे विवाहितेचा विनयभंग झाला आहे.

• अशी तक्रार पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गुन्ह्याची नोंद आणि तपास

• त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

• पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *