औरंगाबाद
औरंगाबाद धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबादमध्ये प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार,औरंगाबादेतील धक्कादायक घटनेत प्रियकराने स्वत:ला पेटवून प्रेयसीला मिठी मारल्याची घटना घडली आहे . औरंगाबाद शहरात सदर धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोघे प्रेमीयुगुल गंभीररित्या जखमी झाले आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे असे प्रेमीयुगुलाचे नाव आहे.दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत.
दोघे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मुलगी संस्थेत प्रोजेक्ट करत होती, त्यावेळी हा तरुण तिथं आला. केबिनचा दरवाजा त्याने लावला आणि त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलं.
त्यानंतर मिठी मारली या तरुण आणि तरुडी दोघेही भाजलेले आहेत. गेले काही वर्ष हे दोघे सोबत होते. मात्र मुलींना लग्नास नकार दिला आणि त्यातून त्यानंतर हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.