पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दिव्यांग मोजमाप शिबिरात प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून दिलीप भोसले यांनी विनयभंग केल्याने पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23/12/2022 रोजी दिव्यांग मोजमाप शिबिर सरकारी रुग्णालय सासवड येथे आयोजित केले होते परंतु जागे अभावी ते छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती कार्यालय सासवड येथे घेण्यात आले सकाळी 11 वाजता चे सुमारास शिबिर सुरू झाले या शिबिरामध्ये असताना दुपारी दोन वाजण्याची सुमारास दिलीप एकनाथ भोसले राहणार भोसलेवाडी हे दिव्यांग शिबिरामध्ये आले व काही एक कारण नसताना ते प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा यांना शिवीगाळ करू लागले. व हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे असे बोलू लागले. त्यावेळीप्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा यांनी त्यांना सांगितले की अरे तुरे बोलू नका हा कार्यक्रम मी आयोजित केलेला नाही तरीसुद्धा दिलीप भोसले हे प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांची साडी ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व शेजारी बसलेला दिव्यांग व्यक्तीची काठी घेऊन त्यांनी प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोटे करीत आहेत.