पुणे
पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास गोळीबार करुन चोरट्यांनी अठ्ठावीस लाख रुपये लुटले. ही घटना अंगडियाचा व्यवसाय करणा-या एकाच्या कार्यालयात घडली आहे.या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.त्याचवेळी चोरट्यांनी गोळीबार केल्याची माहिती स्थानिकांनी सांगितली. या कार्यालयातूनच चोरट्यांनी २८ लाख रुपये चोरले.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पळून गेलेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी केली.पोलिस सध्या संशयित वाहनांची तपासणी करीत आहेत.याबराबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून तपास सुरु करण्यात आला आहे.

