पुणे
भुलेश्वर घाटाच्या पायथ्याजवळील शेरु रिसॉर्टकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शुक्रवारी (दि. २७) सकाळी एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, उजव्या छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या शरीरावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून मृतदेह पेटवून दिला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.