खळबळजनक !!!!!                                     पती कामानिमित्त परदेशी… महिला दुसऱ्याच्याचं प्रेमात, प्रियकराच्या जाचाला कंटाळून घेतली फाशी

खळबळजनक !!!!! पती कामानिमित्त परदेशी… महिला दुसऱ्याच्याचं प्रेमात, प्रियकराच्या जाचाला कंटाळून घेतली फाशी

सोलापूर

सोलापूर येथे प्रेमसंबंधातून एका महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पती कामानिमित्त बाहेरगावी असल्याने महिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. पुढे हे चूक असल्याचे तिला समजले आणि तिने आपला मार्ग बदलला. मात्र प्रियकराकडून महिलेला सातत्याने त्रास दिला जात होता.

या त्रासाला कंटाळून महिलेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप राठोड या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कविता प्रभाकर कल्यानम या महिलेने 4 मार्चला घरीच फाशी घेऊन आत्महत्या केली होती.

त्यांच्या आई सुनंदा चिक्का यांनी सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेकविता कल्यानम यांचे पती तामिळनाडूमध्ये कामाला आहेत. त्यांना अकरा वर्षाचा मुलगा आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांचे शेजारी राहणाऱ्या संदीप राठोडसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत नातेवाईकांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आपले प्रेमसंबंध तोडले होते. मात्र, प्रेमसंबंध तोडल्यानंतर संदीप राठोड हा सातत्याने कविता कल्यानम यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता.

त्यामुळे अखेर या सर्व त्रासाला कंटाळून कविता कल्यानम यांनी आत्महत्या केली. संदीप राठोड हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *