खळबळजनक !!!!                                   जि.प. शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना बिस्किटसाठी दिले शंभर रूपये; विद्यार्थी बिस्किट आणण्यास गेले असता शिक्षकाने वर्गातच घेतला गळफास

खळबळजनक !!!! जि.प. शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना बिस्किटसाठी दिले शंभर रूपये; विद्यार्थी बिस्किट आणण्यास गेले असता शिक्षकाने वर्गातच घेतला गळफास

परभणी

गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने वर्ग खोलीत गळफास घेत आत्‍महत्‍या केली. विठ्ठल अनंत रत्नपारखे असे मयत शिक्षकाचे नावे आहे.

गंगाखेड शहरात राहणारे शिक्षक रत्नपारखे आज सकाळी नेहमीप्रमाणे धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत गेले. त्यांनी शाळा उघडताच विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी शंभर रुपये दिले. बिस्कीटासाठी पैसे मिळताच काही विद्यार्थी बिस्किट आणण्यासाठी दुकानावर गेले. तर काही विद्यार्थी शाळेच्या मैदानात खेळत होते. यानंतर रत्‍नपारखे यांनी वर्गखोलीतच गळफास घेतला.

घटनेची माहिती गावातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान शिक्षक रत्नपारखे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली आहे; हे मात्र समजू शकलेले नाही. शिक्षकाने शाळेमध्येच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *