खळबळजनक!!!                                  आमदार पोहोचण्याआधीच उद्घाटन केल्याने आमदार संतापले,ठेकेदाराला शिविगाळ; मारायलाही धावले

खळबळजनक!!! आमदार पोहोचण्याआधीच उद्घाटन केल्याने आमदार संतापले,ठेकेदाराला शिविगाळ; मारायलाही धावले

पुणे

उद्घाटन करायला गेलेल्या कार्यक्रमाचे आधीच उद्घाटन झाल्याने भाजपा आमदार दादाराव केचे यांनी ठेकेदाराला शिविगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. आर्वी विधानसभा मतदार संघाच्या कारंजा तालुक्यातील दानापूरमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी आमदारांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कारंजा तालुक्यातील दानापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गावचे सरपंच काँग्रेसचे असल्याने त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना कार्यक्रमात बोलावले.

ते भूमिपूजन करुन गेले तोच आमदार केचे पोहचले. झाला प्रकार पाहून ते चांगलेच संतापले व त्यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ केली.

इतकेच नव्हेतर संतापलेले भाजप आमदार ठेकेदाराला मारायलाही धावले. स्थानिकांनी त्यांना अडवल्यानंतर हा वाद संपला. मात्र यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावून या ठेकेदारचा मी जो पर्यंत पाहणार नाही बील काढायचं नाही लक्षात ठेवा, असा दमही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *