मुंबई
पुणे जिल्हा गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने १३ लाख ३२ हजार रुपयांचा धनादेश कोविड १९ च्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळभोर,पुणे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब राळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर तसेच राज्य संघटक बळवंतराव काळे,नवनाथ धुमाळ,महिला आघाडी अध्यक्ष पुणे तृप्ती मांडेकर,कार्याध्यक्ष रोहिणी हांडे आदी पोलिस पाटील उपस्थित होते.
सर्व पोलिस पाटलांनी कोविड काळात गावपातळीवर खुप मोठे योगदान दिले आहे.या संकटकाळात कर्तव्य बजावण्याबरोबरच गावकामगार पोलिस पाटील संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्याची संवेदनशिलता दाखवली आहे ती कौतुकास्पद असल्याचे गोरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.