पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे या ठिकाणी कालच अजितदादा पवार जनसेवा प्रतिष्ठान,आंबळे तर्फे “आमचा जीव आंबळे गाव” अशा गावाप्रती प्रेम निर्माण करणारा व गावाबद्दल अभिमान जागा करणारा एक फलक लावण्यात आला होता.
बारा तास होत नाहीत तोपर्यंतच काही समाजकंटकांनी त्या फलकावरील असणारे “माझं गाव माझा अभिमान, सौजन्य- अजितदादा पवार जनसेवा प्रतिष्ठान,आंबळे” हे काढुन त्या फलकास विद्रुप करण्याचे काम केले आहे.
काही दिवसापुर्वी आंबळे याठिकाणी असणारे अराध्यदैवत व जागृत देवस्थान श्री क्षेत्र ढवळेश्वर याठिकाणीही पिंडीच्या डोक्यावर असणारी पाण्याची कळशीही अशाच समाजकंटकांनी पळवुन नेली होती परंतु गावकर्यांनी नविन कळशी आणुन त्याठिकाणी बसविली.
आज सकाळी सकाळीच हे कळाले आहे तेव्हा खुप वाईट वाटले. आपण गाव एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु काही विघ्नसंतोषी लोक गावात राहुन गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही गोष्ट गावच्या भविष्यासाठी भयानक आहे. : अजित जगताप,अध्यक्ष अजितदादा पवार जनसेवा प्रतिष्ठान,आंबळे.
दहा ते पंधराच दिवसात गावात विद्रृप अशा दोन घटना घडलेल्या आहेत. अशा समाजकंटकाबद्दल निरनिराळे मत गावच्या ग्रामस्थांकडुन येत असल्याचे सध्या पहायला मिळत आहे.
कोण असेल हा भामटा? हा तोच तर नसेल ना? अशा प्रकारच्या उलटसुलट चर्चांना गावात उधाण आलेल सध्या पहायला मिळत आहे.
ज्यांना चांगले करताना म्हणजेच गावच्या विकासकामांबाबत मनात येवढा तिरस्कार आहे अशा लोकांबाबत अजितदादा पवार जनसेवा प्रतिष्ठान काय निर्णय किंवा भुमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे.