रत्नागिरी
शिंदे गटाने बंडाळीनंतर केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्ण बदललं आहे. त्यामुळे राज्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. बंडखोरी केल्यानंतर आमदारांवर गद्दार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तर पुण्यात शिंदे गटाचे आमदार, मंत्री उदय सामंत यांच्या कारची काच देखील फोडण्यात आली होती. दोन्ही गटामध्ये संघर्ष पेटला असताना उदय सामंत विरोधकांना मोठं आव्हान दिलं आहे.
दहीहंडनिमित्त रत्नागिरीमधील श्री प्रतिष्ठान संघटनेने रत्नागिरीमध्ये दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या दहीहंडी स्पर्धेच्या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात सामंत यांनी विरोधक आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
विनायक राऊत यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले, ‘जन्म दिलेल्या आईचं दूध विकलं’ अशा शब्दात माझ्या टीका झाली. मी हे सर्व डोक्यात ठेवलेलं आहे. याचं उत्तर दोन वर्षानंतर एप्रिल २०२४ ला देणार आहे.
ते उत्तर मी जर मी दिलं नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेईन, अशा इशारा विनायक राऊत यांना अप्रत्यक्षपणे दिला. तर पुण्यात उदय सामंत यांच्या कारची काच काही जणांनी फोडली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले होते.
तर उदय सामंत देखील कारवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्या हल्ल्याची आठवण करत विरोधकांना आव्हान दिले आहे.
सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला. पुढच्या १५ दिवसांत त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे’. तर ‘कोणामध्ये किती दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावा, असं आव्हानही उद्य सामंत यांनी दिलं आहे.