कृषीभुषण महादेव शेंडकर पॉलीहाऊसच्या यशानंतर आता शेतात करणार बायोफाॅक फिश फार्मिंग

कृषीभुषण महादेव शेंडकर पॉलीहाऊसच्या यशानंतर आता शेतात करणार बायोफाॅक फिश फार्मिंग

पुरंदर

पिंपरी गावचे सुपुत्र कृषिभुषण महादेव शेंडकर यांनी त्यांच्या शेतामध्ये बायोफाॕल्क फिश फार्मीग प्रकल्पाचे भुमिपुजन सोसायटी चे विद्यमान चेअरमन विजय थेऊरकर,मा.सरपंच मिनाताई शेंडकर, उत्तम हंबीर,मा.चेअरमन हरिश्चंद्रदादा थेऊरकर, संपतदादा शेंडकर, पांडुरंग गायकवाड सोसायटी संचालक सुखदेव हंबीर,बाबुराव शेंडकर, संतोष गायकवाड,शंकरदादा शेंडकर,प्रविण मारणे,सामाजिक कार्यकर्ते दिलीपआप्पा हंबीर,संदिप चव्हाण,शिवाजी शेंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


बायोफाॕल्क फिश फार्मीग प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत कमी पाण्यात मत्स्य पालन करून आधिक उत्पन्न घेतले जाते.

यामध्ये जमिनीत दोन मीटर उंचीचे शेततळे बनवुन त्यामध्ये अति घनत्वामध्ये मत्स्यपालन केले जाते.रींग ब्लोअरच्या सहाय्याने हावेतील आॕक्सीजन पाण्यात मिक्स केला जातो तसेच माशांचे वेस्ट हे बॕक्टेरीयाच्या माध्यमातून कुजवीले जाते व माशाचे वेस्ट हे रिसायकल करून पुन्हा फिड म्हणुन वापरले जाते.

यामुळे माशाच्या खाद्यावरील खर्च हा 30%नी कमी होतो यामुळे उत्पादन खर्च कमी होवुन सरासरी नफा वाढतो.या प्रकल्पाचा एकुण खर्च 30 लक्ष रू.असुन पंतप्रधान मत्स्य संपदा योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कृषिभुषण महादेव शेंडकर यांनी बिहार येथील पाटणा,मध्यप्रदेश येथील दत्तीया,रायगड,हींजवडी आयटी पार्क पुणे,अशा विविध ठिकाणे प्रशिक्षण घेतले आहे पाॕलीहाऊस शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन 2014 मध्ये राज्य शासनाने त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराजबाबा चव्हाण व राज्यपाल महोदय यांच्या हस्ते राज्य स्तरीय कृषिभुषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *