सातारा
किरकोळ वादातून तरुणासोबत अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला आधी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उकळत्या चुन्यात ढकलण्यात आले.
सातारा शहरातील रविवार पेठेत हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. समाधान मोरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे.
तर नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी समाधानला मारहाण करत उकळत्या चुन्यात टाकल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या युवकाचे शरीर ठिकठिकाणी भाजले आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समाधान मोरे या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे त्याला उकळत्या चुन्यात ढकलून नितीन सोडमिसे आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली आहे.
मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजले आहे. क्षुल्लक कारणातून ही मारहाण झाल्याची बाब समोर येत आहे.
त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणारे संशयित हे दारु प्यायलेले असल्याचे तक्रारदाराचा दावा आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.