पुणे
सध्या सर्वत्र सोशल मीडियाची क्रेझ आहे. सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे.राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये देखील एक व्यक्ती शेकोटीच्या आधार घेत आहे. मात्र फक्त शेक घेण्यापेक्षा काहीतरी अतरंगी करावं आणि फेमस व्हावं असं त्याला वाटतं. त्यामुळे हा पठ्ठ्या थेट आगीवर नाचू लागतो.
मात्र त्याची नंतर त्याची भलतीच फजिती होते. एवढंच नाही तर त्याला मोठी अद्दल देखील घडते.सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती शेकोटी समोर उभा आहे. शेकोटीच्या तळपत्या ज्वालांमुळे थंडी थोडी कमी जाणवत आहे. अशात हा व्यक्ती गाणी लाऊन स्टंट करतो. तो थेट आगीवर पाय ठेवून नाचू लागतो. पहिले उजवा पाय वरती ठेवून त्याचा स्टंट दाखवतो. मग डावा पाय देखील वरती करून स्टंट करतो. अशात नंतर हा व्यक्ती दोन्ही पायांच्यामध्ये आगीच्या ज्वाळा घेतो आणि नाचू लागतो.
इतक्यात आग त्याच्या कपड्यांना लागते. ही आग थेट त्याच्या शरीराच्या खाजगी भागाला लागते. आग लागतात त्याचा थैथयाट सुरू होतो. तो सैरभैर पळू लागतो. नंतर एका पाण्याच्या डबक्यात उडी घेतो आणि आग शांत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.स्टंट करण्यासाठी खूप मेहनत आणि सराव करावा लागतो. तसेच आपल्या जीवाची काळजी घेत असे प्रताप केले जातात. टिव्हीमध्ये अनेक रियालिटी शोमध्ये खतरनाक स्टंट पाहायला मिळतात. मात्र तिथे कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. या माणसाला असंच पाहिजे, चांगली अद्दल घडली अशा कमेंट यावर येत आहेत.