पिंपरी चिंचवड
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली. ही घटना पुण्यातील भोसरीलगतच्या इंद्रायणीनगर येथे घडली. सोमवारी पहाटे चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवून दिली.
चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. याबाबत कारच्या मालकीनीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे नाव आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी महिलेनं कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली.