कांदा लागवडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले व तेही अडकले,अन् नातीचं लग्नही लांबणार; “या” गावातील शेतकऱ्याचं दु:ख पाहुन रडु येईल

कांदा लागवडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले व तेही अडकले,अन् नातीचं लग्नही लांबणार; “या” गावातील शेतकऱ्याचं दु:ख पाहुन रडु येईल

नाशिक

राज्यातील शेतकरी आधीच अनेक समस्यांनी चहूबाजूने घेरलेला आहे. त्यात आता कांद्याला चांगले भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. कांद्याच्या उत्पानदनासाठी केलेला खर्च देखील विक्रीतून निघत नसल्याची स्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.यंदा कांदा विकून दोन पैसे हाती येतील ही शेतकऱ्यांनी भाबडी आशा फोल ठरत आहे. नाशिक जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सर्वच शेतकरी कांद्याची लागवड करत असतात.

त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून आपली छोटी-मोठी स्वप्न पूर्ण करत असतात. नाशिकच्या लासलगाव जवळील वेळापूर शिवारात राहणारे रतन भागवत यांचीही अशीच काहीशी छोटी स्पप्न होती. भागवत यांची पाच एकर शेती असून यंदा त्यांनी चार एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली. लागवडीसाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी पत्नी ताराबाईचे दागिणे त्यांनी गहाण ठेवले आणि शिल्लक घरातील रक्कम पन्नास हजार रुपये अशी तजवीज करत कांद्याची लागवड केली.

भागवत यांना आशा ही होती की कांदा विक्रीतून पैसे आल्यावर गहाण ठेवलेली दागिने सोडवता येतील आणि उरलेल्या पैशातून त्यांना यंदा नातीचं लग्न करायचं होतं. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळू लागला आणि त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. कांदा लागवडीसाठी केलेला लाख रुपयांचा खर्च सुद्धा भरुन निघणार नाही, अशी स्थिती सध्या आहे.रतन भागवत यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशा व्यथा अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव आता तरी मिळेल का? असाच प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *