पुणेि
पुण्यातील हडपसर परिसरात एक विचित्र घटना समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघवीला जावून येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन चालक फरार झाला आहे.
संबंधित घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विजय हुलगुंडे असं फरार आरोपी चालकाचं नाव असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकानं हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण सोमवारी 97 लाख रुपयांची रक्कम बघून चालकानं व्यावसायिकाला गंडा घातला आहे.