बारामती
अनंतशांती बहुउद्देशीय सामाजीक सेवा संस्था कोल्हापुर व कसबा वाळवे महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजमाता जिजाऊंच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिशा देणारा ईतिहास घडविला.अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढण्याची जिद्द महाराष्ट्र भुमीत निर्माण केली.ज्यांच्या आदर्श संस्कारामुळे शिवरायांनी आदर्श महाराष्ट्र घडविला, स्वराज्याचे तोरण बांधुन रयतेची सेवा केली अशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्याच कार्याचा आदर्श घेऊन समाजात निःस्वार्थीपणे काम केल्यामुळे बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतुन समाजाची सेवा करीत आहे व यापुढेही समाजातील गोर गरीब लोकांसाठी कार्यरत राहणार आहे असे पुरस्कारार्थी कल्पना जाधव यांनी सांगीतले