एम एस इ बी च्या खांबावर खाजगी केबल व्यवसायिकांचे अतिक्रमण!!!आर्थिक हित संबंध गुंतल्याचे पंकज धिवार यांचा आरोप

एम एस इ बी च्या खांबावर खाजगी केबल व्यवसायिकांचे अतिक्रमण!!!आर्थिक हित संबंध गुंतल्याचे पंकज धिवार यांचा आरोप

सासवड

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कायमच वादाच्या भोवऱ्यात गुंतलेली असल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.ग्राहकांना सेवा पुरविण्यात अपयश तर कधी वीजबिल जास्तच आले,तर कधी वीजबिल न देता अचानक पणे पूर्व सूचना न देता गोर गरिबांचे वीज कनेक्शन कापले. अशा अनेक घटनांमुळे कायमस्वरूपी चर्चेत असणारे विद्युत वितरण ,पुरंदर तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात अंधा धुंदी कारभार करीत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की विद्युत वाहक तारा वाहून नेणारे खांब ठीक ठिकाणी एम एस इ बी ने उभारलेले आहेत. त्या खांबावरून फक्त एम एस इ बी च्या विद्युत तारा वाहून नेण्यासाठी त्याचा उपयोग करण्याची परवानगी असते. तरी देखील बहुतांशी केबल व्यवसायिक खाजगी ऑप्टिकल फायबर केबल,टी. व्ही चॅनल केबल, नेट केबल च्या वायर या खांबावरून टाकत आहेत.याबाबत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी रीतसर विद्युत वितरण कंपनीशी पत्र व्यवहार करून याची माहिती मागवली असता,तशी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे उप अभियंता सासणे यांनी दिली.

त्यानंतर पंकज धिवार यांनी खांबावरील केबल काढून टाकण्यासाठी अर्ज देऊन देखील एम एस इ बी खाजगी केबल व्यवसायिकांवर कारवाई करीत नाही त्यामुळे दि.15 ऑगस्ट रोजी,स्वातंत्र्य दीना दिवशी विद्युत वितरण कंपनी सासवड येथील कार्यालया समोर ,पंकज धिवार आपल्या निवडक कार्यकर्त्यां समवेत उपोषण करणार असल्याचे निवेदन विद्युत वितरण कंपनी कार्यालयास दिल्याचे सांगितले.

याबाबत आमच्या प्रतिनीधिशी बोलताना सांगितले की,विद्युत वितरण कंपनी चे अधिकारी खाजगी केबल व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत.पत्र दिल्या नंतर फक्त दाखवण्यासाठी दोन ते तीन ठिकाणच्या केबल कट केल्या व परत त्या जोडल्या गेल्या याचा अर्थ हा फक्त फार्स होता.

आर्थिक हित संबंधांमुळे विद्युत वितरण अधिकारी उप अभियंता सासणे पाठीशी घालत आहेत.खाजगी केबलच्या अतिक्रमणामुळे एखादे दिवशी या खाजगी केबल चा विद्युत वाहक तारांशी संबंध येऊन अनर्थ होऊ शकतो,त्याची जबाबदारी कुणाची?जोपर्यंत सदरच्या केबल कट करून खाजगी केबल व्यवसायिकांवर फोजदारी कारवाई करीत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *