एमआयएमचा आघाडीतील समावेश म्हणजे शिळूप्यातील गप्पा : विजय कोलते

एमआयएमचा आघाडीतील समावेश म्हणजे शिळूप्यातील गप्पा : विजय कोलते

पुरंदर

काल पासून राज्यभरात एमआयएमचा महाविकास आघाडीत समावेश होणार यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया ही येत आहेत.

राष्ट्रवादीचे  जेष्ठ नेते व प्रवक्ते विजय कोलते  यांनी याबाबत बोलताना या केवळ सिळूप्याच्या गप्पा असल्याच म्हटलंय. त्याच बरोबर असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आघाडीकडे आला नाही आणि येणार ही नाही आणि आला तरी तो स्वीकारणे शक्य नाही. अस त्यांनी म्हटलंय.

काल पासून राज्यभरात एमआयएमचा महाविकास आघाडीतील सामावेश बाबत वर्तमान पत्र आणि इलेक्ट्रोनिक मिडीया व सोशल मिडीया यावर जोतदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे  जेष्ठ नेते व प्रवक्ते विजय कोलते  यांनी मात्र असह प्रकारचा कोणताही प्रस्थाव नसल्याच त्यांनी  म्हटले  आहे.

त्याच बरोबर हा विषय इथच थांबवावा असाही त्यांनी म्हटलं आहे.वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि दूरदर्शन वरील सगळी माहिती लक्षात घेता विनाकारण महाराष्ट्र मध्ये एका बाबीची चर्चा सुरू आहे.

याबाबत बोलताना कोलते म्हणाले की, ‘एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीत येणार त्याबद्दलची चर्चा विनाकारण वाढवलेली आहे. एखाद्या लग्न समारंभामध्ये सहज गप्पा मारताना तुम्ही असे करा  मी असे करतो असं आपण म्हणतो तसा हे झाले आहे याला कोणताही आधार नाही  माध्यमांनी त्याला विनाकारण प्रसिद्धी दिली आणि चर्चा सुरू झाली.

माध्यम प्रश्न उत्तरे करायला लागली. तर असा  कुठलाही अधिकृत प्रस्ताव महाविकासआघाडी आलेला नाही. तो येण्याची शक्यता नाही. आणि  चुकून तो आला तरी तसा प्रस्थाव  स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. कारण जातीवादाचा विचार करणारा पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या निधर्मवादी पक्षांशी जुळवून घेणे शक्य नाही. हे होणे नाही. परंतु चर्चा मात्र वाढत गेली.

म्हणून आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो या गोष्टी होणार नाहीत. यावर अधिक चर्चा करायची गरज नाही. आवश्यकता नाही त्यामुळे अशा टाईमपास करणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करावं’ अस विजय कोलते यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *