पुणे
जेजुरी एम.आय.डी.सी येथील इंडियाना ग्रेटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीच्या चारही कारखान्यांमध्ये ध्वजारोहणाचा मान यंदाही कामगार, कंत्राटदार, कनिष्ठ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही, कंपनीने आपल्या परंपरेला अनुसरून “सन्मान त्या हातांना” देण्याचा निर्धार कायम ठेवला असून जे हात रोज परिश्रमाने कंपनीचा पाया भक्कम करतात. हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, कामगारांना दिलेला विश्वास, सन्मान आणि समानतेचा संदेश असल्याचे वरिष्ठ अधिकारी शेखर बारभाई यांनी आपले मत व्यक्त केले.तसेच या वेळी कंपनीच्या वतीने कामगारांच्या कुटुंबियांना आकर्षक भेट वस्तू देत त्यांना सन्मानित करण्यात आले.
याचबरोबर, इंडियाना ग्रुप समाजाप्रती आपली जबाबदारीही तितक्याच उत्कटतेने पार पाडत आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) अंतर्गत कंपनीने जेऊरी परिसरातील गावांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, सौरदिवे बसविणे, शाळांसाठी शौचालयांची उभारणी, अनाथालयांना धान्यवाटप, जेजुरी स्मशान भूमी साठी मदत.कोविड काळात मार्तंड देवस्थान च्या माध्यमातून मदत, जेजुरी आणि परिसरातील अनेक सामाजिक संस्थांना धान्य वाटप अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवेची नाळ घट्ट ठेवली आहे.
या भावपूर्ण क्षणांना वरिष्ठ अधिकारी शेखर बारभाई, संचालक मनीष शेडगे,आनंद सिंग, सचिन संभाळकर, निशाद सलाम, किशोर कामथे, सागर पवार, सुरेश जगदाळे, भाऊसाहेब जगताप, कैलास कामथे, अक्षय बारभाई, रुपेश महागडे , सुशांत पवार यांच्यासह अनेक कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांच्या स्वरात, तिरंगा आकाशात फडकताना सर्वांच्या डोळ्यांत अभिमानाची आणि आनंदाची चमक दिसत होती. यावेळी उपस्थितांसाठी कंपनीच्या वतीने अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.