पुरंदर
पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजना. या योजनेमुळे पुरंदरचे माळरान देखील बागायती झाले. या येजनेतुन टेकवडी या गावासाठीदेखील शेतीसाठी पाणी मिळते.परंतु टेकवडी या गावामधुन जाणार्या राज्य मार्गावरील असणारा पुल हा पुर्णपणे पुरंदर उपसाच्या पाण्यात बुडुन गेला आहे.
कारण या रस्त्यावरुन ज़र कोणी स्थानिक नागरिक चालत गेला तर त्याच्या पायाच्या घोट्याच्यावर पाणी लागते तसेच ज़र एखादे चारचाकी वाहन रस्त्यावरुन जात असेल व स्थानिक नागरिक त्याठिकाणावरुन चालला असेल तर त्या नागरिकाची पुर्ण आंघोळ होते.”कारण या पुलाची उंची खुप कमी आहे.”
आता फक्त पुरंदर उपसाचे पाणी सुटले म्हणुन रस्त्यावर पाणी येत असेल तर पावसाळ्यात मोठा पाउस झाल्यावर या रस्त्यावरुन स्थानिक व प्रवाशी कसे जाणार हा प्रश्नपडला आहे तसेच रात्री अपरात्री ज़र नविन प्रवाशी या पुलावरुन जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच प्रवाशी करित आहेत.