पुरंदर
पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून लवकरच सासवड-माळशिरस-यवत पीएमपीएल बस सेवा सुरू होणार आहे.
सासवड-माळशिरस या मार्गावर आंबोडी,वनपुरी उदाचीवडी,सिंगापूर,वाघापूर,गुरोळी,राजेवाडी,आंबळे,टेकवडी,माळशिरस तसेच या गावांच्या वाड्या वस्त्यांवरील महिला,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी,व्यवसायिकांना यांना या बससेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.