मुंबई
शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी मराठा मोर्च्याचा जुना व्हिडिओ ट्विट केल्यानंतर नव्या तोंड फुटलं आहे.मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.त्यानंतर संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबर रोजी काढला. त्या मोर्चावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणत मोर्च्याची खिल्ली उडवली. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांच्याकडून महामोर्च्याच्या जागी मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट झाला. त्यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, ‘मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच’.
तर दुसऱ्यांदा ट्विट करत संजय राऊत म्हणाले की, ‘जरूर चौकशी करा…मराठा मोर्चा ही सुध्धा महाराष्ट्राची ताकद होती आणि आहे..महविकास आघाडी मोर्चात ही ताकत सहभागी झालीच होती…करा चौकशी! आपल्या चोर कंपनीला clean cheat देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम झालाय! डरो मत’