पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे गावात गेल्या पंचवीस वर्षापासुन अविरतपणे काकड आरतीचे आयोजन करण्यात येत आहे. या गावाला सांप्रदायाची खुप मोठी परंपरा लाभली आहे.गावात गेल्या सत्तेचाळीस वर्षापासुन हनुमान जयंतीला अखंड हरिनाम सप्ताहाचे देखील आयोजन केले जाते.http://aapulkivivahsanstha.com
भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती |
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा I
दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीन माथा ॥
कार्तिकस्नान पर्व सुरु आहे.भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गावोगावी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरतीचे भक्तिमय स्वर कानी पडत आहेत.हा अपूर्व योग साधून आंबळे (ता.पुरंदर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे स्वरसाधना भजनी मंडळाची काकड आरती भजन सेवा संपन्न झाली.http://aapulkivivahsanstha.com
अतिशय शिस्तबद्ध,पारमार्थिक व संस्कारक्षम अशी काकड आरती सेवा आंबळे ग्रामस्थांकडून सुरू आहे. याची उच्च अनुभूती याठिकाणी आल्यावरच भेटते.या भजन सेवेला पुरंदरचे भूषण उत्कृष्ट मृदंगवादक व गायक ह.भ.प.राजगुरु महाराज व गुर्होळी गावचे जाधव गुरुजी आवर्जून उपस्थित होते. काकड आरती सेवेनंतर आंबळे ग्रामस्थांनी सेवेचा यथोचित सन्मान केला.http://aapulkivivahsanstha.com
यावेळी काकडा मंडळातील बाळासाहेब दरेकर,विजय जगताप,राजेंद्र जगताप,संभाजी काळे,दिलिप दरेकर,कुसुम दरेकर,दिलिप जगताप, प्रमोद दरेकर,रविंद्र दरेकर,रामराव जगताप,महादेव दरेकर,हंबीर जगताप,नंदकुमार जगताप यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.http://aapulkivivahsanstha.com