पुणे
पालकत्व फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार या वर्षी आनंदीकाकी चंदूकाका जगताप यांना हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर घराण्याचे वारस राजाभाऊ पासलकर यांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमाला अनिताताई तुकाराम इंगळे व एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते .
शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आनंदकाकी गाव सोडून पुण्यात जाऊन राहिल्या. आपल्या मुलांना चांगली शिस्त व संस्कार दिले. यामुळे त्यांचे एक पुत्र आय. ए. एस. ऑफिसर झाले. दुसरे पुत्र शिक्षणात एम.बी.ए. सारखी उच्च डिग्री घेतली व पुरंदर तालुक्याचे आमदारही झाले आहे. तालुक्यातील सासवड शहर व डोंगरी भागातील मुलांच्या शिक्षणाचे आबाळ होत आहे हे पाहून काकीने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. मुलींच्या शिक्षणाकडे काकीने विशेष लक्ष दिल्यामुळे तालुक्यातील अनेक मुली शिक्षण घेऊ शकल्या. त्याचबरोबर शाळेतील प्रत्येक विद्यार्थीनीशी संवाद साधून त्यांना आत्मविश्वासही काकिंने दिला.
यावेळी आदर्श पालक राजमाता जिजाऊ या दोन अंकी मनोरंजक नाटकाचा ही शुभारंभ झाला. राजमाता जिजाऊ ने शिवबांना कसे घडवले याविषयी नाटकामध्ये मनोरंजनातून प्रबोधन केले आहे. ती आत्ता काळाची गरज आहे. पुरस्काराची घोषणा पालकत्व फाउंडेशनचे विक्रम ननवरे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासीर इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन विराज देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन सुवर्णा नवसकर यांनी केले.