पुणे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी करसवलतीसह अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाचं एकीकडे सत्ताधारी कौतुक करत असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पाला चूनावी जुमला म्हटलं आहे. राज्याच्या अर्थमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात मुळ प्रश्नांना बगल दिली असं म्हटलं आहे.
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून हा चूनवी जूमला आहे असे म्हटले आहे. अमृत काल नाव देऊन अर्थसंकल्पात मुळ प्रश्नाला बगल देण्यात आली असे पवार म्हणाले. तसेच पूर्वीच्याच घोषणा पुनरुच्चार करण्यात आला असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केंद्राला सर्वात जास्त कर देणारं राज्य असून या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबई काही मिळालं नाही. नऊ राज्याच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना निधी देण्यात आला. आपल्याला झुकत माप मिळाले नाही, हा महाराष्ट्रवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.