आंबळेतील एकही व्यक्ती आरोग्य सुविधांपासुन वंचित राहणार नाही : विठ्ठल जगताप

आंबळेतील एकही व्यक्ती आरोग्य सुविधांपासुन वंचित राहणार नाही : विठ्ठल जगताप

पुरंदर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण पुरंदर तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत मा श्री बाबाराजे जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर भाजपा च्या वतीने आंबळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

आंबळे गावातील 92 लोकांनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला तसेच 37 लोकांना अल्पदरात तर 4 गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले,तसेच तपासणीअंती 12 रूग्णंची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेसाठी यादि आली असून पुढील आठवडय़ात नियोजन करून या पैकी इच्छुक रुग्णांची देसाई हाॅस्पिटल येथे शस्त्रक्रिया केली जाईल असे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल जगताप यांनी सांगीतले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा सरपंच सुभाषशेठ जगताप यांनी केले तसेच विद्यमान सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर,दिलीप जगताप,मा सरपंच मंगेश गायकवाड,बापूसो जगताप,विनोद दरेकर सर,राजेंद्र बधे,अशोक थोरात तसेच उपकेंद्रातील कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *