श्री क्षेत्र नायगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघ युवक शाखेच्या पुढाकाराने व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गावात वृक्ष रोपणाचा उपक्रम राबविला गेला. यावेळी मंदिर, मज्जिद परिसर, स्मशानभूमी व दशक्रियाविधी घाट परिसर व रस्त्याच्या कडेला बहावा, काटे सावर, जांभूळ, पिंपळ,वड, चाफा, जास्वंद, सिता अशोक, जंगली बदाम, घट बोर, रान भेंडी, रिठा, रांजाई व इतर 150 देशी झाडे लावण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच भारती चौंडकर, उपसरपंच दत्तात्रय दरेकर, मा.सरपंच बाळासाहेब कड, यशवंत कड,दत्तात्रय कड, सदाशिव खेसे, मल्हारी कड, काळूराम कड, बबन कड, सुभाष चौंडकर, अनिल शेंडगे,रामदास कड,नामदेव शेंडगे, एकनाथ खेसे, सोनबा कड, नाना कड, रमेश कड, सागर होले,हनुमंत चौंडकर, महासंघाचे युवक शाखा अध्यक्ष सुरज कड, उपाध्यक्ष सागर खेसे, सचिव अजिंक्य कड, तालुका संघटक अमोल कड,महेश कड,अजित कड, सुरज तावरे,राजेंद्र कड, गणेश कड, डॅक्टर अनिकेत कड, मयूर बोरकर,ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.