पुणे
राज्यात सत्ता बदल झाल्या नंतर सर्वाधिक चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना आता त्यांचाच मतदारसंघात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अडीच वर्ष झालं साधा रस्ता केला नाही असा सूर ग्रामस्थांनी बापूंपुढे आळवला.
आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघातील शेळके या गावास भेट देण्यासाठी बापू गेले हाेते. या गावभेटीच्या निमित्ताने गेलेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समाेर अडीच तीन वर्षांत गावाला साधा रस्ता मिळाला नाही किंवा एखादा सभा मंडप अशी नाराजी व्यक्त केली.शेळके ग्रामस्थ म्हणाले माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी आमदार निधीतून गावाला रस्ते आणि तीन सभा मंडप दिले.
परंतु तुमच्याकडून साधा रस्ता किंवा एखादा सभामंडप ही मिळाला नाही असे म्हणत ग्रामस्थांनी बापूंना भर सभेत चांगलेच धारेवर धरत रोष व्यक्त केला.प्रत्येक वेळी अधिक मतदान देवून आपले दुर्लक्ष होत असल्याची खंत ही पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. आमदार पाटील यांच्या गाव भेटीचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरलं झाला आहे.