पुरंदर
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसुर्टी येथे एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी भा.द.वि.कलम 376,506प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिसूर्टी येथे राहणारे आरोपी शिवाजी उर्फ पिंटू उत्तम बरकडे रा. पिसुर्टी बोल्हाईचा मळा ता. पुरंदर जि. पुणे याने दिनांक 29/10/ 2021 रोजी सायंकाळी 3/00 वा.चे सुमारास मौजे पिसुर्टी बोल्हाईचा मळा येथे उसाच्या शेतात पिडीत महिलेवर जबरदस्ती बलात्कार केला.
याची तक्रार दिनांक 08/11/2021रोजी साडे चार वाजता जेजुरी पोलिसात देण्यात आली आहे.या बाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.