पंढरपुर
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्याला बापाला स्वत:च्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री घटना घडली आहे.पोलिसांनी या प्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलांसह तीच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल बागवान असं आरोपी मुलांचे नाव आहे. या घटनेनंतर पंढरपुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.लातूर येथील एका अल्पवयीन मुली बरोबर सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु त्यांच्या लग्नास अफजल बागवान यांचा विरोध होता.त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडून होता.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर होऊन पंढरपुरात आले होते. त्यांनी पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानक समोर सोहेल बागवान यांची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावाने तहसील कार्यालया जवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले.
पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तिच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून हत्या केली. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.