अमोल खरात यांची बहुजन हक्क परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी निवड

अमोल खरात यांची बहुजन हक्क परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी निवड

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवाशी अमोल उल्हास खरात यांची नुकतीच बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धीवार यांच्या हस्ते देण्यात आले.

संघटनेच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज,शाहु,फुले,आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यत पोहोचवुन शेवटचा माणुस केंद्रबिंदु मानुन संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल खरात यांनी सांगीतले.

यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार,उपाध्यक्ष शशिभाऊ गायकवाड,सचिव कैलास धीवार,पुरंदर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा फुलवरे तसेच बहुजन हक्क परिषदेचे पदाधीकारी उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *