अभिमानास्पद!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावातील कष्टकरी कुटुंबातील मुली झाल्या पोलीस

अभिमानास्पद!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावातील कष्टकरी कुटुंबातील मुली झाल्या पोलीस

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पारगांव मेमाणे येथील दोन मुलींनी घरच्या परिस्थितीवर मात करून पोलीस सेवेत केले पदार्पण. कोमल अरुण निंबाळकर आणि माधुरी दत्तात्रय थोरात या दोघींची नुकतीच पोलीस सेवेत निवड झाली. कोमल अरुण निंबाळकर ही एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी घरची परिस्थिती बेताची संपूर्ण शेतीवर कुटुंबाची गुजरान होत असताना वडिलांनी वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलीला बारामती माळेगाव येथे पोलीस प्रशिक्षण संस्थेत दाखल केले .मुलीनेही आई-वडिलांचे कष्ट पाहून जिद्द आणि चिकाटी सोडली नाही नुकतीच तिची पुणे ग्रामीण पोलीस सेवेत निवड झाली.

तसेच माधुरी दत्तात्रय थोरात या मुलीनेही वडिलांचा आधार नसताना आई आणि भाऊ यांच्या पाठिंब्यावर घरीच अभ्यास करून शारीरिक आणि बौद्धिक पात्रतेत उत्तीर्ण होऊन पिंपरी चिंचवड शहर पोलीस मध्ये तिची निवड झाली दोन्ही मुलींनी अत्यंत हालाकिमध्ये दिवस काढून कुटुंबाच्या कष्टाचे चीज केले, दोन्ही मुलींचा गावच्या वतीने ग्रामपंचायतीच्या आवारात सत्कार करण्यात आला सत्काराचे आयोजन शिक्षण विस्तार अधिकारी पी एस मेमाणे यांनी केले .

या मुली तरुण पिढीसाठी आदर्श असतील आणि यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर मुलींनी अनुकरण करावे यासाठी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पी.एस.मेमाणे यांनी सांगितले.

प्रसंगी पोलीस सेवेत दाखल झालेल्या मुलींचे सत्कार गावच्या सरपंच ज्योती भाऊसाहेब मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी सरपंच सर्जेराव केशव मेमाणे, वर्षा राजेंद्र मेमाणे, माजी सरपंच विठ्ठल बबन मेमाणे, अरुण महादेव निंबाळकर, गौरव दत्तात्रय थोरात,सचिव पोपट बाजीराव मेमाणे, रेश्मा चव्हाण, राजश्री गणेश मेमाणे व ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *