मुंबईतील चांदिवली परिसरात एका व्यक्तीन आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुंबई
मुंबईतील चांदिवली परिसरात एका व्यक्तीन आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिला घरात झोपलेली असताना पती रांगत रांगत तिच्याजवळ गेला. यानंतर तिच्यावर चाकून सपासप वार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. हत्येनंतर घरातील अवस्था पाहून पोलिसही हादरले आहेत. आरोपीनं अत्यंत भयंकर पद्धतीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शंकर त्रिमुखे असं आरोपीचं नाव असून ते मुंबईतील चांदिवली परिसरात वास्तव्याला आहे. पाच वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत. तर कोंडाबाई त्रिमुखे असं हत्या झालेल्या 67 वर्षीय पत्नीचं नाव आहे. दोन्ही पाय गमावल्यानंतर आरोपी शंकरला नैराश्य आलं होतं. तसेच मागील काही काळापासून ते आजारीही होते. यातूनच त्यानं आपल्या पत्नीवर अशा प्रकारचा अमानुष हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोंडाबाई यांनी बुधवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण त्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे.
67 वर्षीय मृत कोंडाबाई ह्या बुधवारी रात्री आपल्या घरात झोपल्या होत्या. दरम्यान आरोपी शंकर हातात धारदार चाकू घेऊन रांगत रांगत पत्नीपर्यंत पोहोचला. यावेळी त्यानं पत्नीला काही कळायच्या आत तिच्या छातीवर, पोटावर आणि कंबरेवर धारदार चाकूनं सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, कोंडाबाई यांच्या किंचाळ्या ऐकून त्यांची सूनही खडबडून जागी झाली. सासूसोबत घडलेला सर्व प्रकार सुनेनं आपल्या डोळ्यादेखत पाहिला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.