२वर्षानंतर आला योग
पुरंदर
महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील श्री भुलेश्वर मंदिरात आज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
दरवर्षी मार्च महिन्यामध्ये सुध्दा २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो पण त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढगाळ वातावरण नसते त्यामुळे सरासरी २० ते २५ मिनीटे किरणोत्सव चालतो परंतू आज अवघे ७ मिनीटे किरणोत्सव झाल्यानंतर लगेचच सुर्यकिरण गायब झाले.
यावेळी श्री भुलेश्वर देवस्थानचे पुजारी विजय गुरव यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात सुर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ आहे .यापुर्वी २००२ साली असा योग आला होता.त्यानंतर २०१४ साली ३ वर्षाच्या फरकाने २०१७ साली तर २ वर्षाच्या फरकाने किरणोत्सव झाला . तर यंदा देखील 2 वर्षाच्या फरकाने आज शनिवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सूर्य किरणांनी भुलेश्वर मंदिराच्या गाभार्यात प्रवेश केला . या श्री भुलेश्वरांच्या मुखवट्यास सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे सोनेरी झळाळी आली होती. यावेळी उपस्थितनी हर हर महादेव व भुलेश्वर महाराज की जय असा जयघोष केला . त्यानंतर ६ : ४७ ला ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हा योग फक्त ७ मिनिटे टिकला.