पुरंदर
पुरंदर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट निर्माण करत संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली. सुरवातीला भेकराई व आज सासवडच्या पालखी तळावर सभेचे नियोजन केले. पण दोन्ही सभा ऐनवेळी रद्द केल्याने झेंडेंना अजित पवारांकडून खो दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूकीत संभाजी झेंडे यांनी शरद पवार गटाचा प्रचार करत, अजित पवारांना आव्हान निर्माण केले. त्याचा परिणाम ही जाणवला. शरद पवार गटाकडून ते प्रबळ दावेदार होते.
पण महायुतीच्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी उमेदवारी मिळवली व संभाजी झेंडे यांनी दुसरा पर्याय शोधत अजित पवारांच्या पक्षाची उमेदवारी पटकावत पुरंदरच्या विधानसभेत ट्विस्ट निर्माण करत तिरंगी लढतीचे आव्हान केलेसंभाजी झेंडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी तशी पसंती दिली नसल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील दौऱ्यात निंबूत येथील कोपरा सभेत संभाजी झेंडे यांना साथ देण्याचे आवाहन केले होते. या व्यतिरिक्त एकदा ही अजित पवारांनी झेंडे यांच्या प्रचारार्थ काही वक्तव्य केल्याचे दिसून आले नाही. यामुळे नक्की दादांच्या मनात काय चालू आहे याविषयी पुरंदरच्या राष्ट्रवादी मध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
पुरंदरच्या महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे या आधीच समोर आले होते. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच सासवडच्या पालखी तळावर सभा घेतली. महायुतीच्या वतीने शरद पवारांची आज त्याच मैदानावर सभा होत आहे. तर सायंकाळी नियोजित अजित पवारांची सभा ऐनवेळी रद्द झाल्याने अजित पवार गट व संभाजी झेंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.