मुंबई
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील पेट्रोल डिझेवर लावण्यात आलेल्या करामध्ये कपात करण्यात आली.
त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे.