पुणे
मनोरुग्णांची सेवा करणारा मसिहा तसेच शिवभक्त अशी बिरुदावली अक्षय मोहन बोर्हाडे हा तरूण मिरवत असतो. इतकच नव्हे तर त्याने मनोरुग्णांसाठी संस्था सुरू करून त्याआधारे देणग्या गोळा करत आहे. अक्षय बोर्हाडे या तरुणाने सोशल मिडियावर स्वताची एक सेवाभावी छ. शिवाजी महाराजांचा भक्त अशी प्रतिमा तयार केली आहे. सोशल मिडियावर लाईव्ह येत मनोरुग्णांच्या सेवेचे व्हिडिओ तो टाकत असतो. शिवभक्त म्हणूनही तो व्हिडिओ टाकत असतो. त्याचे हे व्हिडिओ चालतात. परंतु आता त्याचा खरा चेहरा समोर येत असून काही दिवसांपूर्वी त्यान राजकीय नेत्यांवर अक्षेपार्ह टिपण्णीचे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. सोमवारीच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली आहे. या प्रकरणानंतर त्याच्या पत्नीनेही तोंड उघडल असून अक्षय बोर्हाडेच्या ढोंगी वागण्याचा भांडाफोड केला आहे.
रूपाली अक्षय बोर्हाडे अस त्याच्या पत्नीच नाव असून ती अवघी २४ वर्षांची आहे. टी वाय बीए शिकलेल्या रूपालीने अक्षयविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.रूपालीने अक्षयबरोबर प्रेमविवाह केला असून त्यांना अक्षत्र नावाचा एक मुलगा आहे. रूपाली सध्या तिच्या माहेरी तळेरान येथे राहत असून अक्षय जुन्नरमधील शिरोली बुद्रुक येथील निवासी आहे. अक्षयला आई-वडील तसेच एक लहान भाऊ आहे. रूपाली तिची कल्याणला असणार्या बहिणीकडे शिकायला होती. तिथे तिने मोबाईलवर अक्षय मोहन बोर्हाडे याची एक व्हिडिओ क्लिप बघितली ज्यात तो मनोरुग्णांची सेवा करतो याची माहिती तिला कळाली तिला सहाजिकच अक्षयबद्दल आदर वाटला तिने कल्याण येथील एका मनोरुग्ण स्त्रीची माहिती अक्षयला सांगितली व तिला मदत करण्याची विनंती केली. अक्षयनेही मी कल्याणला आल्यावर तिला घेऊन जातो अस आश्वासन दिल. परंतु अक्षय कल्याणला गेलाच नाही तर तो रूपालीला वाॅटस अपवर गुड मॉर्नींग, गुड नाईट असे मेसेज करू लागला. दरम्यान काही दिवसात त्याने रूपालीला जुन्नरला शिकायला येण्याची गळ घातली. आकर्षित झालेली रूपालीही जुन्नरला शिकण्यासाठी आली व तिने एफ वाय बीएला अॅडमीशन घेतल. जुन्नरमध्ये अक्षय आणि रूपाली यांच्यात जवळीकता वाढली व अक्षयने रूपालीला लग्नाच वचन देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले. परंतु रूपालीने लग्नाची गळ घालताच अक्षयने टाळाटाळ सुरू केली. यावर हताश होत रूपालीन विषारी औषध प्राशन केल, परंतु त्रास व्हायला लागल्यावर ती स्वताच दवाखान्यात अॅडमिट झाली. तिथे अक्षय तिला बघायला गेला व त्याने तिच्याशी लग्न करण्याच कबूल केल. दोघांनी आळंदीत लग्न केल याला अक्षयच्या घरची संमती होती. नेहमीप्रमाणे अक्षयने खोटेपणा करत शिवाजी महाराजांसमोर एकमेकंना हार घालत विवाह केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. अक्षयची फेकगिरी रूपालीच्या हळूहळू लक्षात आली.
सुरुवातीला अक्षयचे कुटुंबिय व अक्षय यांनी रूपालीला चांगली वागणूक दिली परंतु हळूहळू त्यांचा खोटेपणा समोर येऊ लागला. अक्षय दारू पिऊन रूपालीला मारहाण करत असे. अनेक गुंडांबरोबर त्याची उठबस असे. किंबहुना तो स्वताच गुंडप्रवृत्तीचा आहे हेही रूपालीच्या लक्षात आल. रूपालीन सांगितल अक्षय बोर्हाडे काहिही कामधंदा करत नसून फलाईव्ह व्हिडीओ तसेच मनोरुग्ण संस्थेला ज्या देणग्या येतात त्यातून मित्रांबरोबर चैन्या करतो. मटणाच्या जेवणावळी झोडत असतो. मी असतानाही त्याचे बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध होते. त्याच्या मोबाईलवर मला हे कळताच मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने दारू पिऊन मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मी परत विषारी औषध प्राशन केल यावेळी चुलत सासरा व जावेने मला दवाखान्यात अॅडमिट केल. त्यानंतर परत अक्षयने चांगल वागण्याचा बनाव केला व आपण सुधारलो असल्याची कबुली दिली. त्यानंतर रूपाली गरोदर राहिली व तिचे हाल सुरू झाले इतकच काय तिची डिलेव्हरीही घरातच झाली. मनोरुग्णांच्या सेवांच्या खोट्या गप्पा मारणारा अक्षय अतिशय निष्ठुर असून तो दारू पिऊन मनोरूग्णांनाही मारतो तसेच काहीजणांना रात्रीतूनच गायब करतो असही रूपालीच म्हणण आहे.
दुसरीकडे एका मुलीनेही रूपालीला फोन करून अक्षयने मला फसवल असल्याच सांगितल. अक्षयकडे पिस्तूल असून तो वारंवार त्याचा धाक दाखवत असतो. कमी वयात प्रसिध्दी, पैसा मिळालेला अक्षय बेफाम वागत असून त्याची गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. स्वताची खोटी इमेज निर्माण करणारा अक्षय बायकोला छळत असून तिला मारहाण करत असतो. एकूणच रूपालीने अक्षय बोर्हाडेचे कुटुंबिय आपल्याला छळत असल्याची तक्रार दाखल केली आहे.