ह्रदयद्रावक!!!!       दोनच महिन्यापूर्वी विवाह;शारीरिक व मानसिक छळास कंटाळून नवविवाहितेने संपवले जीवन

ह्रदयद्रावक!!!! दोनच महिन्यापूर्वी विवाह;शारीरिक व मानसिक छळास कंटाळून नवविवाहितेने संपवले जीवन

पुणे

श्रीपतधामणगाव ता.घनसावंगी,जि.जालना येथील दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने शारीरिक व मानसिक छळास कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ढाकेफळ ता. घनसावंगी येथील सर्जेराव किसनराव चांदर यांची मुलगी वैष्णवी (वय-22 वर्षे) हिचा श्रीपतधामणगाव ता. घनसावंगी येथील रामेश्वर गुलाबराव शिंदे याचे सोबत सोयरीक जुळवताना सात तोळे सोने व पाच लाख रुपये हे कॅश अशी मागणी केली होती.

त्याप्रमाणे ढाकेफळ येथे 27 डिसेंबर 2024 साखरपुड्यामध्ये ही रक्कम देण्यात आली होती त्यानंतर या दोघांचा 20 एप्रिल 2025 रोजी ढाकेफळ येथे विवाह संपन्न झाले. सुरुवातीला आठ दिवस सासरी वैष्णवीस चांगली वागणुक दिली होती. मात्र त्यानंतर तिला सासरकडील मंडळींनी छोट्या छोट्या गोष्टीवरुन टोमणे देऊन वारंवार शिवीगाळ करुन त्रास देण्यास सुरुवात केली.

तसेच तिचा पती रामेश्वर हा दारु पिवून वैष्णवी हिस कृषी सेवा केंद्र दुकान टाकण्यासाठी तुझ्या वडीलांकडुन अजुन पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणुन तिला वारंवार मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. परंतु परंतु वडील सर्जेराव चांदर यांनी दोन महिन्यापुर्वी मुलीचे लग्न करुन दिल्याने आत्ता पैसे नाही असे मुलीला सांगितलले होते.

दरम्यान रविवारी (ता. 21) वैष्णवी हिने वडील सर्जेराव चांदर व चुलत भाऊ शिवराम चांदर यांना फोन करून सासरकडील मंडळींनी पैशाची मागणी करून शिवीगाळ व जिवे मानाची धमकी देण्याची सांगितले. दोन दिवसात पैश्याची तडजोड करुन तुला पैसे पाठुन देतो.’ असे म्हणून फोन कट केला होता.
त्यानंतर त्याच दिवशी मुलगी वैष्णवी हिचे तब्येत खराब झाली असुन ति आमच्यासोबत दवाखान्यात येत नाही, तुम्ही तात्काळ श्रीपतधामणगाव येथे येऊन तिला दवाखान्यात घेऊन जा असे सांगितल्याने नातेवाईकासह श्रीपतधामणगाव येथे गेले असता वैष्णवी हिने तिच्या घरातील लोंखडी अँगला साडीने गळफास घेतल्याची दिसुन आले त्यावेळी तिचे सासरकडील एकही व्यक्ती तेथे हजर नव्हता.

फक्त गावातील इतर लोक लेथे हजर होते. त्यानंतर आम्ही पोलीसांना बोलावुन घेवुन मुलगी वैष्णवी हिस खाली घेऊन ग्रामीण रुग्णांलय घनसावंगी येथे दाखल केले असता डॉक्टरानी मुलगी वैष्णवी हिस तपासुन ति मयत झाल्याचे सांगुन तिच्या प्रेतावर शव विछेदन करुन प्रेत पुढील अंत्यविधी करिता ताब्यात दिले होते.

श्रीपतधामणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मंगळवारी (ता. 24) सर्जेराव चांदर यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती रामेश्वर गुलावराव शिंदे, सासु-सुमनबाई गुलाबराव शिंदे, मोठा भाऊ दौलत गुलाबराव शिंदे सर्व रा. श्रीपतधामणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *