पुणे
अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 12 वर्षीय मुलाला विष पाजून स्वतःही विष घेतलं आहे.
या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील हमालपुरा येथे ही घटना घडली असून योगिता वाघाडे वय ३४ वर्ष व अथर्व वाघाडे वय १२ वर्ष असं मृतक मायलेकांचे नाव आहे.
पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यानंतर उदरनिर्वाहाच्या ओढातानीने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. गरिबीच्या परिस्थितीत मुलाचं संगोपन होत नसल्याने आईने मुलाला विष देऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.