पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील महाशिवरात्री निमीत्त हजारो भाविकांनी आज शिवलिंगाचे दर्शन घेतले.
पहाटे तीन वाजता शिवलिंगावरती दही दुध व पंचामृतने आंघोळ घालण्यात आली.फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.पहाटे पाच वाजता महाआरती करण्यात आली .साडे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.सकाळपासुनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.दुपारी मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मस्कु शेंडगे यांच्या वतीने लस्सी वाटप करण्यात आले.दिवसभर भाविकांची संख्या वाढत गेली यामुळे मंदिराभोवतो भली मोठी रांग लागली .दर्शन बारीवरती मंडपाची व्यवस्था नसल्याने भाविकांनी उन्हाचा ञास सहन करावा लागला.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला.माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दिवसभर आरोग्य सेवा देण्यात आली.
वाहणे वन विभागातील कमानीबाहेर अडवल्याने मंदिराभोवती वाहणांची कोंडी झाली नाही.
अनुराज साखर कारखाण्याच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.दिवसभर खिचडीचे अन्नदान करण्यात आले.हर हर महादेव च्या जयघोषाने भुलेश्वर मंदिर परिसर दणाणुन गेला.