स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आमदारांवर टीका करता ; अहो विजय शिवतारे तुम्हाला दहा वर्षात अंगणवाडी तरी काढता आली का?

स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आमदारांवर टीका करता ; अहो विजय शिवतारे तुम्हाला दहा वर्षात अंगणवाडी तरी काढता आली का?

पुरंदर

माजी राज्यमंत्री विजय शिवतरे हे पुरंदर तालुक्यात होणाऱ्या विकास कामांवर सातत्याने टीका करत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या दौऱ्यावर देखील त्यांनी टीका केली. पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका विजय शिवतरे करत असतात. विजय शिवतारे हे १० वर्ष सत्तेमध्ये होते. आपण पुरंदरचा किती विकास केला. सातत्याने आपण बारामतीचे पुरंदर ची तुलना करत असता १० वर्षांमध्ये आपल्याला एखादे कॉलेज किंवा अंगणवाडी सुधा काढता आले नाही. असा आरोप पुरंदर तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी विजय शिवतरेंवर केला

सासवड (ता पुरंदर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्कराज जाधव बोलत होते. यावेळी पुष्कराज जाधव पुढे म्हणाले की, आमच्या नेत्यांवर जर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ स्वतःचा कारखाना नगर जिल्ह्यामध्ये काढला शिवतारेंनी एकही कारखाना पुरंदर मध्ये उभा केला नाही व युवकांना रोजगार दिला नाही. आपण पुरंदरचा कॅलिफोर्निया करणार होते त्याचे काय झाले. याचे देखील उत्तर भविष्यात शिवतरेंना द्यावे लागेल.

राज्यातील आमचे नेते शरद पवारसाहेब अजित दादा सुप्रियाताई सुळे व तालुक्यातील विजयराव कोलते यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जर टीका करत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवु : पुष्कराज जाधव,अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस,पुरंदर

कोणत्याही मोठा प्रकल्प विजय शिवतारेंनी पुरंदर मध्ये आणला नाही. स्वतःच्या बगलबच्चाना पोसण्यासाठी कामे दिली. स्वतःचा ना करते पण आज झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आमदारांवर टीका करतात. शिवतरे ज्या शाळेमध्ये शिकले त्या रयत शाळेला सव्वा लाख रुपये वगळता एकही रुपया दहा वर्षांमध्ये दिला नाही. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 12 लक्ष रुपयांची मदत या शाळेला झाली मागील निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांनी गुंजवणी धरणावर सहलींचे आयोजन केले होते. तेथील कार्यालयामध्ये आपण फिल्म दाखवल्या होत्या. व यामध्ये गुंजवणीच्या पाणी तुम्ही सर्वांना दाखवत होता. यातून लोकांची तुम्ही दिशाभूल केली व निवडणुका जिंकल्या आहेत असे माजी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण समितीचे सदस्य योगेश फडतरे यांनी शिवतरेंवर टीकास्त्र सोडले.

विमानतळा मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, गेली आहेत शेतकरी हे उध्वस्त होणार आहेत. यांची कधी शिवतरे तुम्ही चौकशी केली का आपण आपला बंगला व परिंचे येथील जमीन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना द्या म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळेल शेतकऱ्यांच्या पुनर्वासनाबाबत शिवतरे कधीच बोलत नाहीत. असे कामगार आघाडीचे अध्यक्ष विक्रम फळके यांनी सांगितले.

यावेळी, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, जिल्हा जिल्हा परिषदेचे स्वीकृत जलसंधारण समितीचे सदस्य योगेश फरतडे, युवक उपाध्यक्ष युवराज जगताप, दिवे गराडे गटाचे युवक अध्यक्ष सुमित लवांडे, कामगार सेलचे अध्यक्ष विक्रम फाळके, सासवड शहर युवक अध्यक्ष अतुल जगताप, विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संदेश पवार, अभिजीत दुर्गाडे, रवींद्र मोरे, संदीप जगताप, श्रीपाद गुरव, शुभम जगताप उपस्थित होते. तर या पत्रकार परिषदेच्या संयोजन शिवाजी कोलते यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *