पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नितीन लक्ष्मण काळे यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सरपंच रामदास काळे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे गुरुवार दि.३० रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी काळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलअधिकारी राजाराम भामे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अर्चना महाजन यांनी काम पाहिले.यावेळी मा.सरपंच रामदास काळे,उपसरपंच सुरेखा माळवदकर,ग्रा.सदस्य भारत मोरे,संतोष काळे, श्रध्दा काळे,अलका शेळके,मंदाकिनी काळे,मंगल आढाळगे,पोलीस अधिकारी सुभाष काळे, चेअरमन तुकाराम झेंडे,माजी चेअरमन विलास काळे,राजाराम काळे,दीपक झेंडे,दत्ता बापू काळे, संतोष काळे,अशोक काळे,आनंता काळे,विठ्ठल काळे,राजेंद्र काळे,तंटामुक्ती अध्यक्ष संजय काळे, अक्षय कामठे,नितीन काळे,श्रीधर शिंदे,संदीप काळे,सर्जेराव काळे,गौरव काळे,सुरेश काळे, तसेच शिवसैनिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गट तट बाजुला ठेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचे काम आम्ही करु तसेच माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातुन गावचा विकास साधन्यासाठी प्रयत्न करणार : नितीन काळे,सरपंच,सोनोरी
काळे यांच्या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव व उपसभापती दत्तात्रय काळे यांनी त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी पानवडीचे माजी सरपंच हरिभाऊ लोळे, दिवे गावचे माजी सरपंच राजुशेठ झेंडे, भिवरीचे सरपंच संजय कटके उपस्थित होते.