सुरज जगताप यांची युवासेना राज्य विस्तारक पदी नेमणूक

सुरज जगताप यांची युवासेना राज्य विस्तारक पदी नेमणूक

पुणे

मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयात राज्यातील युवासेना वाढीसाठी सासवड शहरातील युवक नेते सुरज उत्तम जगताप यांची राज्य विस्तारक पदी नेमणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

यावेळी युवासेना सचिव किरण साळी, जिल्हा संघटक ममता लांडे-शिवतारे, नवनिर्वाचित बारामती लोकसभा संघटीका गीतांजली ढोणे, हरिभाऊ लोळे, उपसभापती दत्ता काळे, युवासेना समन्वयक गणेश मुळिक, विजय ढोणे, संजय कटके उपस्थित होते.

सुरज जगताप हे अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत, आगामी निवडणुका व पक्ष वाढ हे हित लक्षात घेऊन जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सुरज जगताप हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *