नाशिक
मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका माजी मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे माजी मंत्री म्हणजे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता.
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागीतली होती.पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस मधुकर पिचड यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.