सहकारी पोलिस शिपायाचा सुपारी देऊन खुन ; महिला पोलिस गजाआड

सहकारी पोलिस शिपायाचा सुपारी देऊन खुन ; महिला पोलिस गजाआड

मुंबई

काही दिवसांपूर्वी पनवेल येथील मालधक्का परिसरात झालेल्या अपघातात एका हवालदाराचा मृत्यू झाला होता. संबंधित हत्या नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला असता, पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली. यानंतर या अपघातात प्रकरणाला नवीन वळण आल असून संबंधित अपघत नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महिला पोलिसानं सुपारी देऊन अपघात घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिला पोलिसासह अन्य दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शिवाजी माधव सानप असं हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. मृत सानप हे 15 ऑगस्ट रोजी पनवेल रेल्वे स्थानकापासून मालधक्क्याकडे पायी चालले होते. दरम्यान भगत चाळीसमोरून जात असताना एका अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. यानंतर सानप यांना जवळच्या  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला पोलिसासह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

शीतल प्रकाश पानसरे, विशाल जाधव आणि गणेश चव्हाण ऊर्फ मुदावथ अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. या घटनेचा तपास करत असताना, पोलिसांनी संबंधित परिसरातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी मृत सानप पनवेल रेल्वे स्थानकातून बाहेर पडले असता, त्यांच्या पाठीमागे सावकाश येणारी एक मोटार आढळली. यानंतर पोलिसांनी सानप लोकलमध्ये कुठून बसले आणि कुठे उतरले याची तपासणी केली. दरम्यान संबंधित मोटार आणि सानप हे कुर्ला येथून पनवेल येथे जाण्याचं निघाल्याचं दिसून आलं आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकल्या. शीतल पानसरे यांनी सुपारी दिल्यानं आपण अपघात घडवल्याचं आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *